आठवणी – बहिणाबाई माझी बाळ गं !

आठवणी – बहिणाबाई माझी बाळ गं !

मी आणि मांडीवर माझी धाकटी बहीण..
————————-
#killicorner
————————-
ती बाळ असतानाची गोष्ट. अस्मादिकांना ताई झाल्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद झाला होता. असं वाटायचं आपणच पूर्ण वेळ बाळाला घेऊन बसावे.आई बाबा सोडून इतर कोणीही तिला घेतलेलं मला आवडत नसे.
पण ती शहाणी माझ्याकडे आली की मोठ्याने गळा काढून रडत असे.

असंच घरात एकदा फोटो काढणं सुरू होतं. मीही छान लाल फ्रॉक घालून बसले होते.

मावशीला भांडून तिचं गळ्यातलं मी घातलं, ती सांगत होती, तुझा फ्रॉकचा गळा बंद आहे, गळ्यात काय घातलंय ते दिसणार नाही वगैरे. पण नाही,आम्हाला ते गळ्यात हवंच होतं. कपाळावर design चं रंगीतरंगीत गंध लावून स्वारी कॅमेरा समोर बसली. आणि जे व्हायचं तेच झालं..

बाळाने भोकाड पसरलं.. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अस्मादिकांनी स्मितहास्य केले आणि फोटो क्लिक झाला..😊

2 thoughts on “आठवणी – बहिणाबाई माझी बाळ गं !

  1. खूपच छान. अगदी खरे. सहसा असेच घडते मोठ्या बहिणींसोबत.

  2. माझी दीदी छळायची मला, गाढ झोपेतून उठवायची, हे अजूनही चालू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!