उपासाच्या शेवयांची खीर

उपासाच्या शेवयांची खीर

पूर्वतयारीचा वेळ: ५ मिनिटे

प्रत्यक्षात लागणारा वेळ: १५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 
उपासाच्या शेवया – दोन वेटोळे ,
दूध – साधारण ४ कप ,
साखर – चवीनुसार, ५-६ टे स्पून,
साजूक तूप – ३-४ टे स्पून,
वेलची पुड – चिमूटभर

शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया विकत मिळतात, त्या आणाव्यात.

क्रमवार पाककृती: 

१. शेवयांचे वेटोळे उकलून हातानेच चुरा करा. खूप कडक असतात. थेट भाजताना तोडायला गेल्यास इकडे तिकडे उडून पडतात. त्यामुळे आधीच शेवया एका टोपात उडणार नाहीत अशा बेताने काळजीपूर्वक तोडून घ्याव्यात.
2. ह्या तोडलेल्या शेवया खमंग मंद आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तुपावर भाजून घ्या.
३. एकीकडे दूध तापण्यासाठी ठेवून द्या, कमी आचेवर.

४. भाजताना शेवया फुलतील. लगेच लाल होऊन काळ्या पडू शकतात. त्यामुळे सतत हलवत राहून भाजायचे आहे. साधारण लालसर झाल्या की आच बंद करा.


५. भाजलेल्या शेवयांवर हळूहळू गरम दूध ओता.
६. आता त्यावर साखर घाला.
७. खिरीचे मिश्रण नीट ढवळून घ्या. झाकण ठेवा.
८. जरा वाफ आली की त्यावर वेलचीपूड व तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता.

ही खीर गरम किंवा थंड कशीही छानच लागते. एवढंच की थंड झाल्यावर लगेच आळते आणि घट्ट होते.

पूर्वप्रकाशित:
स्पंदन दिवाळी २०२१ इ अंक

वाढणी/प्रमाण: माझ्यासारखा खाणारा असेल तर एकटाच खाऊन संपवेल.

टीप : संपूर्ण पाककृती मंद आचेवर करायची आहे.

माहितीचा स्रोत: स्वतः केलेला प्रयोग आणि ऐकीव माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!