उपेक्षित (शतशब्द लेख)

उपेक्षित (शतशब्द लेख)

१०० शब्दांचा लेख अशी श्रेणी असती तर हा लेख तिथे टाकला असता. तूर्तास, उपेक्षित (शतशब्दलेख)  प्रयोग समजून गोड मानून घ्या.
————————————————————————————–

लेख
अगदी वाजत गाजत तिचे आगमन होते, तिच्या येण्याची वार्ता सहज सर्वांना समजते. पण तरीही ती दुर्लक्षित! लक्षवेधक असलेली ती आपल्या अस्तित्वाची जाणीव वारंवार करून देत असते. बरं, ती एकटीच येते असंही नाही, सखे, सवंगडी बरोबर घेऊनच येते. भविष्यात घडू पाहणाऱ्या महत्वाच्या घटनांमध्ये तिचा मोठा वाटा असणार हे माहित असूनही लोक तिला उपेक्षित ठेवतात. तिच्या येण्याविषयी नाना तर्कवितर्क लढवले जातात. ती ओरडून जगाला जाब विचारते आणि तिचा प्रभाव अधिक वाढवते.
तिच्या येण्याने शरीरातला कण अन कण भारून जातो, कुठेही लक्ष लागत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येणारी, सर्वपरिचित, कुठल्याही ऋतूचं वावडं नसणारी अशी, विशेषकरून लहान मुलं जिला प्रिय आहेत, अशी ती, सर्दी!!
————————————————————————————-
**किल्ली**
————————————————————————————–

किल्लीने लिहिलेल्या  रंजक मराठी कथा वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!