कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)

प्रत्यक्ष AI काय ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्याआधी दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूया.

समजा, तुम्ही चारचाकी गाडी चालवत तुमच्या इष्ट स्थळी पोचलात आणि आता तुम्हाला तुमची गाडी पार्क करायची आहे. मग तुम्ही पार्किंगसाठी जागा शोधता आणि व्यवस्थित वळवून तुमचे वाहन त्या जागी उभे करता. ह्यासाठी तुम्ही तुमच्या मानवी मेंदूचा(Human Intelligence) वापर करून available parking spot detection, vehicle parking ही कार्ये करता. जागा शोधून गाडी लावणे हे मानवी मेंदूसाठी अगदी सोपे काम आहे. त्यासाठी विचार करून कृती करण्यासाठी लागणार वेळ मानवासाठी अगदीच नगण्य आहे. (अट: जागा पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरची असू नये. तांत्रिक भाषेत This may become NP-hard problem for your computer and you will get feasible solution, not optimal by reducing some constraints. म्हणजे गाडी एखाद्या दुकानाच्या गेट समोर पार्क होऊ शकते, जागीच थांबू शकते किंवा इतर काही एरर देऊ शकते. एवढी कॉम्प्लेक्सिटी तिला झेपायची नाय! असो.)

पण समजा असं झालं तर, तुम्ही इष्ट स्थळी पोचल्यानंतर गाडीला सांगितलेत, की “बाई गं, पोचलोय आपण. तू आता तुझ्यासाठी जागा शोध आणि तिथे शांत उभी राहा.” यावर कार निमूटपणे आज्ञा ऐकून घेऊन तिचे पालन करते अर्थात ऑटोमॅटिक पार्क होते!  ह्या तिच्या टॅलेंटचा उगम हा machine intelligence किंवा AI मधून झाला आहे.

अर्थात हे खूपच जनरल उदाहरण झालं. प्रत्यक्षात तिथे अनेक सेन्सर्स आणि actuators machine learning प्रोग्रॅम्सच्या आज्ञा पाळत असतात.

प्रसिद्ध संगणक तज्ञ जॉन मॅकार्थी हे AI चे एक गॉडफादर म्हणून गणले जातात. त्यांच्या व्याख्येनुसार “AI हे बुद्धिमान यंत्रे (विशेषकरून बुद्धिमान संगणकीय आज्ञावली) तयार करण्याचे शास्र आणि कला आहे[1]”. मूलभूतपणे, AI ही यंत्र किंवा संगणक प्रोग्रामची विचार करण्याची, अनुभव घेण्याची, आलेल्या अनुभवांवरून शिकण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची क्षमता असते असे म्हणता येईल. AI ची संकल्पना सांगते की, अशी यंत्रे बनवा की जी मनुष्यांप्रमाणे विचार करणे, विचारानुरूप कृती करणे आणि शिकणे यासारख्या क्षमतांनी युक्त असेल. मग त्यासाठी कोणतीही समस्या सोडवण्यासाठी मानवी मेंदू विचार कसा करतो, समस्येचं समाधान सोडवताना पूर्वी आलेल्या अनुभवावरून उत्तर ठरवून कृती कशी करतो ह्याचा अभ्यास केला जातो. थोडक्यात काय तर, संगणकाला विचारशक्ती प्रदान कशी करावी ह्याचे शास्त्र म्हणजे AI!!

सहसा माहिती स्टोर केलेली मशीन्स ईंटेलिजंट नसतात.. ती प्रोसेस करून डिसिजन घेऊ शकणारी माणसे ईंटेलिजंट असतात. पण AI व मशिन लर्निंगमुळे ही कन्सेप्ट बदललेली आहे.

कोणताही सामान्य कॉम्प्युटर प्रोग्रॅम किंवा आज्ञावली साठवलेल्या माहितीला प्रोसेस करून त्याआधारे अनुमान, निष्कर्ष किंवा प्रश्नाचे उत्तर शोधून काढते. ह्या प्रकारात दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे काम होत असल्यामुळे त्याला विश्लेषणात्मक किंवा तार्किक बुद्धी नसते. हे काम अत्यंत कमी वेळात आणि अचूकतेने होते हे मात्र खरं.
उदाहरणादाखल समजा, अ आणि ब ह्या चलाच्या किंमती माहित असताना त्याची बेरीज कोणत्याही परिस्थिती तितकीच येते. ह्याउलट उद्या विशिष्ट मार्गाने ‘अ’ ह्या गाडीला जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे ह्याचे अंदाजे उत्तर AI प्रणाली देऊ शकते. ते दरवेळेस १००% अचूक असेलच ह्याची खात्री नसते. कारण अशा समस्यांमध्ये बरीच गृहीतकं असतात आणि त्यांच्या किमती वेळेनुसार बदलत असतात. वरील उदाहरणात मार्गावरची त्या विशिष्ट वेळेवरची रहदारी, वातावरण (पाऊस, बर्फवर्षाव असेल तर वेग कमी होतो), रस्त्याची कमाल वेग मर्यादा, रस्त्याचा प्रकार इ अनेक बाबी प्रश्नाचं अंतिम उत्तर ठरवतात.

आता AI प्रणाली वापरून संगणक एखाद्या विषयाचे ज्ञान त्याला दिलेले नसताना केवळ साठवलेल्या माहितीवर आधारित अनुमान्/निर्णय/भाकितं याबद्दल मानवी इंटलिजन्स पेक्षा जास्त अचूक वेध घेऊ शकतो. यासाठी डीप पेशंट, अल्फा गो, केंब्रिज अ‍ॅनलिटिका ही उदाहरणे आहेत.
याचे कारण लाखो प्रकारच्या डेटा पॉइंट मधे दडलेले संबंध एकाच वेळी तपासून निर्णय घेणे मानवी मेंदूच्या पलिकडचे आहे .
काही बाबतीत ते संबंध आहेत अशी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही असे संबंध AI मुळे उघडकीस आले आहेत आणि हे सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या बुद्धीपलिकडे झाले आहे.

संदर्भ सूची:

[1] http://www-formal.stanford.edu/jmc/whatisai/node1.html

Read more about data science, Here:

3 thoughts on “कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!