
क्रश (शतशब्दकथा)
तो
छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे.
जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती.
मनातले प्रेम व्यक्त करण्याची शक्ती दे म्हणून देवाला विनवण्याकरिता मंदिरात गेला असताना तीही तिकडेच येताना दिसली.
ती शूज काढत असताना त्याचे लक्ष तिच्या पायाच्या बोटांकडे गेले.
प्रेमभंग झालेला तो सवाष्ण मुलींनी सगळे सौभाग्यालंकार घातलेच पाहिजेत असे जिथे तिथे मत मांडत फिरू लागला.
*****************************************************
किल्लीने लिहिलेल्या अशा अनेक रंजक मराठी कथा वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
१०० शब्दात खुप काही सांगून जाणाऱ्या आणि धक्कादायक शेवट असणाऱ्या शतशब्दकथा म्हणजे कथेतला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असतो.
आणखी अशा रंजक शतशब्दकथा वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
****************************************************
One thought on “क्रश (शतशब्दकथा)”
तू तूच माझी नेक्स्ट पार्ट लवकर लिहा