
गैरसमज – (शतशब्दकथा)
“नाही जमणार”
“काय?
हे बघ, लग्नाच्या आधी ह्या विषयावर आपलं बोलणं झालेलं तेव्हा असंच ठरलं होतं ना, म्हणजे तुला आठवत असेल तर ही माझी एक महत्वाची अट होती. आता तू नाही जमणार असं कसं म्हणू शकतोस?”
“तू म्हणतेस तसंच ठरलं होतं आधी. पण नाईलाज आहे.”
“मी प्रयत्न करून पाहते. After-all आता मी तुझी बायको आहे., माझा पूर्ण हक्क आहे.“
“जशी तुझी इच्छा”
“Hello, आई, तुम्ही आपल्या पुण्याच्या घरी राहायला कधी येताय? “
………
“तुमच्याशिवाय आमच्या संसाराला काही अस्तित्व किंवा अर्थ नाही. आम्ही वाट पाहतोय.”
मुलाच्या संसारात आपली अडचण होणार हा गैरसमज सुनेच्या प्रेमळ शब्दांनी दूर झाला आणि ती मनोमन आनंदली.
—————————————————————-
**किल्ली**
—————————————————————-