चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा

जिन्नस: 

गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचे
बेसन १ मोठा चमचा
जीरे चिमूटभर
ओवा चिमूटभर
तीळ चुटकीभर
चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरून
बटर अमूल ची अर्धी वडी
चीझ क्युब २-३ किसून
मोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुन
कोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुन
तेल
पिण्यायोग्य पाणी

पाककृती

औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे बनवावे ह्याचा चवीवरून अंदाज घेऊन आज थोड्या व्हेरिएशन सह घरी स्वतः प्रयत्न केला. मस्त जमलाय (मला तरी आवडला ). 
– कणकेत तिखट/ हिरव्या मिरच्या बारिक चिरून, मीठ, हळद, ओवा , जीरे, तीळ, बेसन घालून मिक्स करावे
– आता वरील मिश्रणात कांदा(पात घेणार असाल तर चिरलेली कान्दा पात), कोथिम्बीर घालून हलक्या हाताने कोरडेच मिक्स करून घ्यावे
– मिश्रणात किसलेले चीझ घालावे, हाताला तेल लावुन कणिक मळण्यास घ्यावी. चीझ मुळे पीठ चिकट होते.
– बेताने पाणी घालत मऊसूत कणिक मळून घ्यावी
– अर्धा तास झाकुन ठेवावी
– नेहमीप्रमाणे पराठे लाटून तापलेल्या तव्यावर बटर लावुन भाजुन घ्यावेत
– भाजताना बटर न लावता गरम पराठा ताटात घेतल्यावर त्यावर बटर घालू शकता. असे केल्यास भाजताना तेलाची बोटे लावुन पराठे उलटसुलट भाजुन घ्यावेत

टिपा: 

अजुन चांगल्या चवीसाठी स्टफ करून पराठे बनवु शकता.
तसे करताना सारण म्हणून किसलेला कान्दा, चीझ, किन्चीत मिरेपुड, थोडीशी कोथिम्बीर असे घ्यावे
आज सोमवार उर्फ मंडे असल्यामुळे मी एव्हढे धाडस केले नाही

प्रकाशचित्रे:


भिजवलेला कणकेचा गोळा

कच्चा लाटलेला पराठा

तयार पराठा बटरी बटरी

हापिसात न्यायचा डब्बा, पराठे विथ टमाटे लोणचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!