डेटिंग बिटिंग

डेटिंग बिटिंग

“काय सांगतेस काय ईशा? तू त्या मुलाला dating app वर भेटलीस? अगं आधीच मुलांचा काही भरवसा  नसतो आणि हा तर अशा ठिकाणी भेटलाय.”

“अशा ठिकाणी म्हणजे? अगं हे apps हल्ली खूप जण वापरतात. Casual dating असलं तरी माणसं खरीच असतात ना?”

“ते गाणं ऐकलंयस ना, casual friends थे फिर bestfriends हो गये?”

“हो अगं, बिगिनी शूट, काहीही आणि, ते गाणं नाहीये मुळात “

“गाणं असो वा डायलॉग तू मुद्दा लक्षात घे “

“Ok dear,जास्त involve नाही होणार आणि alert राहणार. बास का? आता जाऊ मी date ला?”

“मास्क लावून जा गं आणि दूर राहा त्याच्यापासून, दो गज की दुरी पाळ, sanitizer स्प्रे केल्याशिवाय no handshake आणि hug बिग तर नकोच  “

“हो हो आजीबाई, निघते, आणि कळवते तुला online राहा chatting app वर “

……थोडया वेळानंतर…………

“Hieeee, आलीस पण लगेच?”
“मला कडक चहा हवाय, प्लिज कर “

“डोकं दुखतंय का?”

“हसू नकोस, the date was terrific!!”
“बरं झालं “

“म्हणजे?”

“काही नाही, हा चहा घे. मला सांग नेमकं काय झालं?”

“अगं, तो मुलगा mad होता. सतत uk चं कौतुक! त्याला काय obsession आहे uk चं देव जाणे. प्रत्येक गोष्टीच्या दुसऱ्या वाक्यात uk, uk. सतत uk. असं वाटत होतं त्या टॉवर ब्रिज खाली गाडून टाकावं ह्याला “

“शांत हो, हे होणारच होतं. तू व्यवस्थित अभ्यास करून गेली नव्हतीस”

” date वर गेले होते परीक्षेला नाही, अभ्यास कसला नीट सांग “

“त्या त्याचं sm analysis केलं असतंस तर असा वेळ वाया गेला नसता. मी बोलणार होते पण तू ऐकायच्या मूड मध्ये नव्हतीस”

” sm analysis काय आता नवीन? नीट सांगतेस का.? आधीच डोकं खराब झालंय “

” अगं काही नवीन नाही, जुनंच. Sm म्हणजे social media. जसं की insta, febu.. “

” माहितेय पुढे बोल पटापट, एक मिनिट, u mean मी त्याला stalk करायला हवं होतं? No way, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे?”

“ऐकून घे, घाईच फार असते तुला. आता गेला ना वेळ वाया त्या uk वाल्यामुळे? “

” बोल “

” त्याचं insta वगैरे सगळं पाहायचं. कुठे check in करतोय, गाणी कोणती वापरतोय reels ला, photos मध्ये काय आहे, सोबत कोण कोण आहे वगैरे. Febu वर पण थोडीफार मिळते माहिती. पण असले so called cool dudes insta वर पडीक असतात. तू आहेस ना? “

“हो, आहे पण जास्त पाहत नाही. Boar होतं मला “

” पण हल्ली सगळे तिकडेच timepass करतात. तुझे 47 followers आहेत फक्त. Reels नाहीत. Checkins नाहीत. मुलांना कसं समजणार तुझ्या आवडी? “

” ए तू माझ्यावर घसरू नको “

” मग काय, dating app चालतं, insta नको म्हणते “

” बरं माझे बाई, आता काय करू सांगणार आहेस का? “

” पुढच्या date ला जाण्याआधी माझं मार्गदर्शन घे. आपण नीट plan करू. तू कोणते कपडे घालणार, jewellery, तुझं eyeliner सुद्धा मी लावून देणार “

” तू फारच controlling होत चाललीयेस हल्ली “

” व्हायलाच हवं. शेवटी तुझी मोठी बहीण आहे ना मी!”

” हो ताईसाहेब, चला पुढचा case study सुरु करूयात. नवा match आलाय “

आणि ते घर त्या दोन बहिणींच्या हास्य कल्लोळात बुडून गेलं…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!