नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा

लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली.

“आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.”

“आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?”

“काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?”

“ड्रग्स?”

“अदिती तशी मुलगी नाही.“

“दारू?”

“काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.”

“मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?”

“असू शकेल. नुकतंच लग्न झालेलं असूनही तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल ती आपल्याला काहीच सांगत नाही.” “घरगुती हिसाचार तर नसेल? बघ, आज ती पूर्ण बाह्यांचा ड्रेस घालून आलीये. केस कसेबसे वरवर विंचरून बांधलेत. दुःखी असेल बिचारी.”

“तिलाच विचारूया का?”

“अगं असं कसं थेट विचारणार तुला मारलं का सासरी म्हणून? थोडा वेळ वाट पाहू, मग आपल्यापैकी एकीने जाऊन हळूच विषय काढायचा.”

“पण ही बया कॉफी मशीनच्या इथे गेली.”

“अरेच्चा, तिला कॉल आलाय.”

.

.

“हॅलो साहिल. अरे डोकं जाम चढलंय. तुलापण असंच होतंय का?

.

.

.

.

हम्म. चुकलंच आपलं. पुढच्या वेळेस असं नाही करायचं. काहीही झालं तरी सकाळी सकाळी साग्रसंगीत पुरणपोळीचं जेवण जेवायचं नाही. मग कोणाचंही कितीही आग्रहाचं आमंत्रण असू देत. किती जायफळ घालतात मावशी पुरणात काय माहिती? “

One thought on “नशा – (द्विशतशब्दकथा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!