परी व्हायचंय मला _ कविता

परी व्हायचंय मला _ कविता

परी व्हायचंय मला _ कविता
———————————————–
असे कसे हे शोषित पारतंत्र्यातील जगणे
बंधनाच्या कोंदट कारागृहात मनाला जखडून ठेवणे |
व्यक्त होऊ पाहणाऱ्या जाणिवांना थांबवणे
भावनांना आतल्या आत दाबून टाकत कुढत राहणे ||

सगळे साखळदंड तोडून टाकणार मी
कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार मी |
वायुप्रमाणे संचार करणार मी
अनंत ब्रह्मांडे पालथी घालणार मी ||

स्वातंत्र्याचे पंख लेवून स्वछंदपणे विहरायचंय
ह्या कोंडलेल्या श्वासांना मुक्त करायचंय |
स्पंदनांच्या जाणिवांना व्यक्त करायचंय
पिंजरा तोडून भरभरून जगायचंय||

नाजूक नकोत, मजबूत पंख हवेत मला
उत्तुंग भरारीसाठी स्वतःचं आकाश हवंय मला |
पारतंत्र्यात त्रस्त जीवांना सोडवायचंय मला
हो, ह्यासाठीच परी व्हायचंय मला ||

————————————————————
**किल्ली**
————————————————————

One thought on “परी व्हायचंय मला _ कविता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!