आवडती साडी – पैठणी

आवडती साडी – पैठणी

माझी पहिली (आणि एकुलती एक) पैठणी…… लग्नातली..
———
मला ना, साडीचा पदर हा भाग खुप आवडतो. पण नेमका तोच मिरवता येत नाही. पिन अप केलेला बिचारा पदर आपल्या पाठीवर रुळत आपल्या मागे मागे फिरत असतो. खरे तर सर्वात जास्त कलाकुसर त्यावरच असते. (मला flowing pallu अजिबात सांभाळता येत नाही, trust me).
मग पदरावरची design show off करणारी ही खास pose 😃 (मला ही एकच आहे येते,वेगळी pose try केली आहे , पण त्यात मी बावळट दिसते, जाऊ देत कशाला ती चर्चा 😝😝.झाकली मूठ सव्वा लाखाची)
————-
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Smile is the best make-up every girl can wear.. ever…😊
म्हणून हा no -makeup look.. फक्त छानसे झुमके, कपाळाला टिकली, हातात बांगड्या आणि माझा जीवनसाथी चष्मा (तो style चा नाही, गरजेचा भाग आहे)
————–


————
हा रंग 🔶 पैठणी मध्ये common नसावा.
मला साड्या कशा घ्यायच्या ह्यातलं काहीही कळत नसताना घेतलेली..
(आजही कुठे कळतं म्हणा.. एखादी साडी मनात भरली की घेऊन मोकळी होणारी मी, आणि माझ्या ह्यांना shopping मधलं जास्त कळतं. त्यामुळे आम्ही सुखी आहोत 😝)
हा फोटो माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला माहेरी गेले होते तेव्हाचा आहे 

🙂
माहेर कोणतं?
अचूक ओळखलंत,
‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!