बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत

बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत

बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत

किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा

उपासाच्या थालीपीठाची कृती ह्या पोस्ट मध्ये आहे. जरूर वाचा. 🙂

जिन्नस:
ज्वारीचं पीठ – ३ वाट्या
बेसन /चणाडाळीचं पीठ – १ वाटी
लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
जिरे – चिमूटभर
ओवा – चिमूटभर
तीळ – चिमूटभर
हळद – चिमूटभर
धणेपूड – थोडीशी
कोथिंबीर – बारीक चिरून
कांदे बारीक चिरून – २
आवडत असतील तर टोमॅटो – १ बारीक चिरून
तेल

पाककृती:
“भूक लागलीये,खमंग काहीतरी खायची इच्छा होतेय. पोटभरीचं चटकन होईल असं काय करावं बरं ?”
“थालीपीठ कर.”
“भाजणी नाहीये पण ”
“बिग डील. मी सांगते तसं कर .”
“सांग मग”
“ही घे कृती:”
१. एका परातीत किंवा टोपात वरील सर्व साहित्य एकत्र करावे (तेल सोडून)

२. पाणी टाकून पीठ मळून घ्यावे
३. साधारण थालीपीठाला भिजवतो तसे छान मऊ थापले जाईल असे मळावे
गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे

४. नॉन स्टिक पसरत भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे.
गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत.
बरेच जण प्लास्टिक कागदावर थापून मग तव्यावर/ पसरत भांड्यात शेकतात/भाजतात
मी डायरेक्ट तव्यावरच थापले.
थापताना ज्वारीची पीठ हाताला चिकटते, म्हणून हाताला तेल लावून घ्यावे
५. थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे
(तेलामुळे चव चांगली येते, कमी तेल टाकले तरी चालू शकते )
६. दोन्ही भिजुनी खरपूस ,खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे
कडक झाल्यानंतर खायला आणखी मजा येते

७. भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे

टिपा:
थालीपीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळ झाकून तसेच राहू द्यावे. मस्त कडक होतात

One thought on “बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!