बीटचा हलवा

बीटचा हलवा

साहित्य:
बीट – ३ नग,
शुद्ध साजूक तूप -३ टे स्पून (more is better ),
साखर – ४ चमचे ( चवीनुसार व आवडीनुसार कमिजास्त करु शकता, दगडापेक्षा वीट मऊ हवी असल्यास गूळ वापरा. त्याची चव सुद्धा भन्नाट लागते. Natural sweetner आवडत असेल तर stevea वापरा [ मी कधी वापरला नाही त्यामुळे प्रमाण सांगता येणार नाही ]. हे explanantiom आणि पर्याय पदार्थ आरोग्यदायी करण्यासाठी सुचवले आहेत. नाहीतर साखर दिसली म्हणून बाद कराल Happy ),
वेलची पूड चिमूटभर,
साय/ मलाई असेल तेवढी Lol २ ते तीन चमचे,
सुकामेवा आवडीनुसार

क्रमावर पाककृती :
१. बीट किसून घ्या
२. कढईत तूप घाला. तुपावर बीटचा किस खमंग परतून घ्या
३. त्यावर झाकण ठेवा. वाफ येऊ द्या.
ही प्रक्रिया मंद आचेवर करायची आहे हे ध्यानात असू द्या
४. किस चांगला शिजला की साखर / गूळ घाला
५. मिश्रण पातळ होईल. ते हलवत राहा.
गॅस मध्यम असू द्या.
६. घट्ट झाले की त्यात मलाई / साय घाला
खवा सुद्धा घालू शकता
७. वेलची पूड, सुकामेवा घालून गरम गरम सर्व्ह करा
गार झालेला हलवा सुद्धा छानच लागतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!