भाकडकथा – शतशब्दकथा

भाकडकथा – शतशब्दकथा

भाकडकथा – शतशब्दकथा

——————————————————————————————-*

“तिच्या डोळ्यात पावसाळी ढगांसारखे मळभ दाटले होते.”
“तिच्या डोळ्यांच्या गहिऱ्या डोहात उदासीचे काळेभोर पाणी साचले होते.”
“तिचे डोळे दुःखामुळे खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होते.”

“भयानक उपमा सोडून दुसरं काही लिहिता येत नाही का तुला?”

“माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात. “

“काहीतरी भारी लिही, हे उदासी प्रकरण is too downmarket!”

“काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते.”

“What rubbish! कारणं नकोत. आजच fresh script लिहून झाली पाहिजे.”

धाडकन दार आपटून ती आत निघून गेली.

“काहीही फेकतो हा.
ह्याने लिहिलेलं खरं झालं असतं तर चमत्कारांच्या भाकडकथा प्रत्यक्षात घडल्या असत्या.”

—————————————————————————————————————

तिने सताड खिडकी उघडली आणि पंख फडफडवत खिडकीबाहेर झेप घेतली!

——————————————————————————————-*

कथेचा अर्थ :

open ended , गृहीतकांवर आधारित रहस्यकथा /शशक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
बरेच interpretations काढता येतील.
तिचे Birdwoman असणे हे त्यापैकी एक, जे लिहिताना माझ्या डोक्यात नव्हतं.

आता विचार केला होता ते सांगते
(कदाचित माझा thought अधुरा/ चुकीचा असू शकतो किंवा बरोबरही असेल.)

लेखकाचा असा विश्वास आहे कि तो जे लिहितो, किंवा त्याच्याकडून जे काही लिहिलं जातं ते खरं होतं.
आज त्याच्याकडून काही फ्रेश लिहिलं जात नाहीये उदास छटा असणारी वाक्ये कागदावर/स्क्रीनवर उमटत आहेत जे अर्थातच तिच्या पसंतीस उतरत नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की लिहिलेलं खरं झालं असतं तर परीकथा( ज्यांचा उल्लेख ती भाकडकथा असा करते) त्याही खऱ्या झाल्या असत्या.
कथेतील शेवटचं ट्विस्ट देणारं वाक्य ‘ती ‘ स्वतः एक परी आहे हे सूचित करतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!