मेथीचा घोळाना – झटपट मराठवाडी तोंडीलावणे

मेथीचा घोळाना – झटपट मराठवाडी तोंडीलावणे

पूर्वतयारीचा वेळ: १५ मिनिटे

प्रत्यक्षात लागणारा वेळ: १० मिनिटे

लागणारे जिन्नस: 
१.ताजी कोवळी निवडून धुतलेली व बारीक चिरलेली मेथीची पाने,
२.बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन कांदे,
३.लाल तिखट चवीनुसार,
४.मीठ चवीनुसार,
५.दाण्याचा कूट 3-4 टे स्पून (म्हणजे आपला फराळाचा चमचा )
६.फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे
७. तळलेला किंवा भाजलेला पापड

क्रमवार पाककृती: 

घरची किंवा ताजी कोवळी मेथी असली की हमखास घोळाना केल्या जातोच. चटपटीत आणि चटकन होणारा पदार्थ आहे.
१.एका मोठ्या टोपात मेथी, कांदा, तिखट, मीठ, दाण्याचा कूट, पापड हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्या.
२.हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिसळून घ्या.


३.फोडणी साठी 1-2टे स्पून तेल गरम करा. तेल तापले की मोहरी घाला. ती तडतडली की जिरं घाला. जिरं छान लालसर झालं की फोडणीचा गॅस बंद करून ती टोपातल्या मेथीच्या मिश्रणावर ओता.
४.सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या. मेथीच्या पानांना सगळा मसाला एकसारखा लागला पाहिजे.
५.गरम गरम कडक भाकरी/पोळी सोबत सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!