रमायण

रमायण

लेकीचे कौतुक करत तिच्यावर आधारित लेखन करण्यासाठी “रमायण” लेखमालिका सुरु करत आहे. सुरुवातीला असंच random जसं सुचेल तसं लिहीत जाईन. नंतर structured format मध्ये लेख स्वरूपात आणता येईल.

…………………………………………………………………………………………………

  1. आज फक्त ओळख करून देते

जिच्या नावातच ‘राम’ आहे, आपल्या आगमनाने जिने आमचे विश्व प्रेमरूपी सुगंधाने दरवळून टाकले आहे, जीआयुष्याचा बहर आहे, ती माझी छकुली रमा आहे.


रमाबाई लेक माझी डोंगरात घर
काळेभोर केस तिचे दिसते सुंदर।
गोरीपान कांती तिची मोठे मोठे डोळे
बोलके आहेत जसे खोल पाणी गहिरे।।

……………………………………………………………..

रमाबाई नात माझी
गोड गोड गोडूली
दिसते कशी सुंदर
बाहूली सानुली
टकामका बघते
चोहिकडे
गोड गोड हसते
आनंदी गडे

  • शाम लाटकर

……………………………………………………………………..

माझिया अंगणात आली सोनपावले
सोनपावलांच्या संगे रुणझुणताती पैंजणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!