
विबासं – शतशब्दकथा
“आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे”
“काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे”
“ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे”
“काय?”
“विबासं”
तो फक्त हसला.
“असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय”
“बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस”
“संबंध नाही कसं? ही समस्या तुझ्यामुळेच निर्माण झाली आहे. तूच हा गुंता सोडवायला हवास. मी आज विबासं करू शकत नाही ते केवळ तुझ्यामुळे. जरा गंभीरपणे विचार कर. तुलाही ह्यातून कदाचित जीवनातले हरवलेले थ्रिल गवसेल”
“बास कर बडबड…………………………………………………………………………………………………………………………..
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे”
—————————————————————————
**किल्ली**
#killicorner
विबासं म्हणजे विवाह बाह्य संबंध
————————————————————————–