हकालपट्टी – शतशब्दकथा

हकालपट्टी – शतशब्दकथा

हकालपट्टी – शतशब्दकथा

“ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं.”
“असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”
“तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन.”
“तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!”
असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.
—————————————————————————-
**किल्ली**
————————————————————————–

किल्लीने लिहिलेल्या अशा अनेक रंजक मराठी कथा वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

3 thoughts on “हकालपट्टी – शतशब्दकथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!