पुडचटणी

पुडचटणी

 पुडचटणी

किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा

जिन्नस: 

हरभरा डाळ १ पेला
उडीद डाळ १/२ पेला
तीळ १/२ पेला
तांदुळ १/२ वाटी
गुळ १/४ किलो
मोहोरी २ छोटे चमचे
जिरे २ छोटे चमचे
मेथी दाणे २ छोटे चमचे
हिंग चवीनुसार
मीठ चवीनुसार
लाल तिखटाची पूड १ वाटी
सुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करून
हळद १/२ छोटा चमचा
तेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

१ – तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.
(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)
२ – डाळी, तांदूळ, तीळ (वेगवेगळे) बारिक वाटून घ्यावे
३ – चिंच तेलावर परतुन घ्यावी व बारिक करुन घ्यावी (
-लिंबा ऐवढी पुरेल चिंच,  ती तेलात तळून घ्यायची म्हणजे डाळींबरोबर वाटल्या जाते.)
४ – तिखटाची पूड, सुके खोबरे तेलावर परतून घ्यावे
५ – गूळ बारीक किसून घ्यावा

– तेलात मोहरी, जिरे ,हिन्ग, मेथी दाणे व किन्चित हळद घालून फोडणी करावी
– फोडणी गार झाल्यावर वरील जिन्नस (क्र. २.३.४.५) क्रमाने एकानन्तर एक फोडणीत घालावे आणि मिक्स करावे.
– चवीनुसार मीठ घालावे आणि मिक्स करावे

टिपा: 

– महिनाभर /वर्षभर टिकते बहुतेक. जास्त ही टिकत असेल. कारण हा मुरवून पुरवून खाण्याचा पदार्थ आहे, ताजा कधी खाल्ला नाही
– ही चटणी विशेषकरून लग्नकार्य असेल तर केली जाते.
– चिवडा लाडूच्या पाकिटात मेतकूटाबरोबर पुडचटणी सुद्धा आवर्जून उपस्थितांमध्ये वाटली जाते.  – -थोडा बदल म्हणजे अजून जास्त पौष्टीक करायची असेल तर जवस १ कप, अर्धाकप हरभरा डाळ, पावकप उडीद डाळ, भरपूर कढीलिंब,  चिंचेच्या ऐवजी अंबाडी पावडर वापरावे. 

-तिखट , आंबट -गोड अशी मस्त चव येते. तोंडीलावणे म्हणून छान लागते.
मी खाताना बऱ्याचदा पुडचटणी तेलात कालवून घेते . मिनी इडल्या तुपात तळून पुडचटणीमध्ये घोळून मस्त लागतात. दडपे पोहे किंवा तिखटामिठाचे लावलेले पोहे बनवताना त्यात मेतकूट आणि पुडचटणी छान लागते.

प्रकाश चित्रे:


तयार पुडचटणी १

तयार पुडचटणी २

One thought on “पुडचटणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!