कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)
प्रत्यक्ष AI काय ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्याआधी दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूया. समजा, तुम्ही चारचाकी गाडी चालवत तुमच्या इष्ट स्थळी पोचलात आणि आता तुम्हाला तुमची गाडी पार्क करायची आहे. मग तुम्ही पार्किंगसाठी जागा शोधता आणि व्यवस्थित वळवून तुमचे वाहन त्या जागी उभे करता. ह्यासाठी तुम्ही तुमच्या मानवी मेंदूचा(Human Intelligence) वापर करून available parking spot detection, vehicle parking ही कार्ये करता. जागा शोधून गाडी लावणे हे मानवी मेंदूसाठी अगदी सोपे काम आहे. त्यासाठी विचार करून कृती करण्यासाठी लागणार वेळ…