Browsed by
Category: Story / कथा

कथा

विबासं – शतशब्दकथा

विबासं – शतशब्दकथा

“आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे”“काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे”“ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे”“काय?”“विबासं”तो फक्त हसला.“असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय”“बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस”“संबंध नाही कसं? ही समस्या तुझ्यामुळेच निर्माण झाली आहे. तूच हा गुंता सोडवायला हवास. मी आज विबासं करू शकत नाही ते केवळ तुझ्यामुळे. जरा गंभीरपणे विचार कर. तुलाही ह्यातून कदाचित जीवनातले…

Read More Read More

दुपार

दुपार

प्रकरण १ भर उन्हाळ्यातली दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन, तापलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वाऱ्याच्या झळा ह्या टिपीकल उन्हाळ्यातच घडणाऱ्या बाबींनी जेरीस आणलं होतं. तिचं मन कासावीस होत होतं. जिकडे बघावं तिकडे रखरखाट नुसता!  मध्येच एखादं हिरव्याकंच पानांच्या वैभवाने नटलेलं झाड दिलासा देऊन जाई. पण तेवढ्यापुरतं तेवढंच. तहान तर जन्मोजन्मी पाणी न प्यायल्यासारखी लागत होती. सतत घसा कोरडा पडत होता. जवळचं पाणीही संपत आलं होतं. जे होतं तेही गरम झालं होतं. कधी एकदा घरी पोचतेय…

Read More Read More

सुट्टी – (शतशब्दकथा)

सुट्टी – (शतशब्दकथा)

काकूंनी कर्कश्य आवाजात किंचाळून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं तोंड दाबून ती पुन्हा झोपली. पण एवढ्या-तेवढ्यावर ऐकतील त्या काकू कसल्या? एकदम चिवट स्वभाव! त्यांनी १० मिनिटांनी पुन्हा तारसप्तकात सूर आळवला.काकू पूर्वी मंजुळ आवाजात हाक मारून तिला उठवत असत. पण वरचेवर आळशी होत जाणारा तिचा स्वभाव आणि तिनेच कधीतरी दिलेल्या सूचनेला अनुसरून त्यांनी वारंवार किंचाळून उठवणं सुरु केलं होतं. एखाद्याला झोपेतून उठवणं हे फार भारी काम नव्हे. पण काकू आपलं कर्तव्य नेटाने निभवत असत.शेवटी ती उठून तयारी करू लागली. काकूंमुळे आज…

Read More Read More

गैरसमज – (शतशब्दकथा)

गैरसमज – (शतशब्दकथा)

“नाही जमणार”“काय?हे बघ, लग्नाच्या आधी ह्या विषयावर आपलं बोलणं झालेलं तेव्हा असंच ठरलं होतं ना, म्हणजे तुला आठवत असेल तर ही माझी एक महत्वाची अट होती. आता तू नाही जमणार असं कसं म्हणू शकतोस?”“तू म्हणतेस तसंच ठरलं होतं आधी. पण नाईलाज आहे.”“मी प्रयत्न करून पाहते. After-all आता मी तुझी बायको आहे., माझा पूर्ण हक्क आहे.““जशी तुझी इच्छा” “Hello, आई, तुम्ही आपल्या पुण्याच्या घरी राहायला कधी येताय? “………“तुमच्याशिवाय आमच्या संसाराला काही अस्तित्व किंवा अर्थ नाही. आम्ही वाट पाहतोय.” मुलाच्या संसारात आपली…

Read More Read More

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. “आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.” “आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?” “काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?” “ड्रग्स?” “अदिती तशी मुलगी नाही.“ “दारू?” “काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.” “मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?” “असू शकेल. नुकतंच लग्न झालेलं असूनही…

Read More Read More

error: Content is protected !!