Browsed by
Category: Story / कथा

कथा

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

कथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. भाग ५ हर्षदाची कंपनी मिळाल्यामुळे श्रुतीला तसं बरंच मोकळं वाटत होतं. ती श्रुतीच्या अगदीच मोजक्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती. फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहावे असं जरी ठरलं असलं तरी श्रुतीला एकटीला फ्लॅटवर राहण्यास धाकधूक वाटत होती. बरं , फ्लॅट sharing बेसिस वर घ्यावा म्हटलं तरी जराश्या रिजिड स्वभावाच्या श्रुतीला नवीन मुलींमध्ये मिसळुन राहणे…

Read More Read More

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग १

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग १

तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग १ श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. भाग १ आदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने…

Read More Read More

हकालपट्टी – शतशब्दकथा

हकालपट्टी – शतशब्दकथा

हकालपट्टी – शतशब्दकथा “ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं.”“असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”“तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन.”“तिच्या वाईट अवस्थेला…

Read More Read More

ग्रीन सिग्नल

ग्रीन सिग्नल

ग्रीन सिग्नल एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई…

Read More Read More

क्रश (शतशब्दकथा)

क्रश (शतशब्दकथा)

तो छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे. जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती. मनातले प्रेम व्यक्त करण्याची शक्ती दे म्हणून देवाला विनवण्याकरिता मंदिरात गेला असताना तीही तिकडेच येताना दिसली. ती शूज काढत असताना त्याचे…

Read More Read More

error: Content is protected !!