Browsed by
Category: Marathi

marathi sahitya, katha

दुपार – भाग १

दुपार – भाग १

भर उन्हाळ्यातली दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन, तापलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वाऱ्याच्या झळा ह्या टिपीकल उन्हाळ्यातच घडणाऱ्या बाबींनी जेरीस आणलं होतं. तिचं मन कासावीस होत होतं. जिकडे बघावं तिकडे रखरखाट नुसता!  मध्येच एखादं हिरव्याकंच पानांच्या वैभवाने नटलेलं झाड दिलासा देऊन जाई. पण तेवढ्यापुरतं तेवढंच. तहान तर जन्मोजन्मी पाणी न प्यायल्यासारखी लागत होती. सतत घसा कोरडा पडत होता. जवळचं पाणीही संपत आलं होतं. जे होतं तेही गरम झालं होतं. कधी एकदा घरी पोचतेय आणि घटाघटा…

Read More Read More

सुट्टी – (शतशब्दकथा)

सुट्टी – (शतशब्दकथा)

काकूंनी कर्कश्य आवाजात किंचाळून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं तोंड दाबून ती पुन्हा झोपली. पण एवढ्या-तेवढ्यावर ऐकतील त्या काकू कसल्या? एकदम चिवट स्वभाव! त्यांनी १० मिनिटांनी पुन्हा तारसप्तकात सूर आळवला.काकू पूर्वी मंजुळ आवाजात हाक मारून तिला उठवत असत. पण वरचेवर आळशी होत जाणारा तिचा स्वभाव आणि तिनेच कधीतरी दिलेल्या सूचनेला अनुसरून त्यांनी वारंवार किंचाळून उठवणं सुरु केलं होतं. एखाद्याला झोपेतून उठवणं हे फार भारी काम नव्हे. पण काकू आपलं कर्तव्य नेटाने निभवत असत.शेवटी ती उठून तयारी करू लागली. काकूंमुळे आज…

Read More Read More

गैरसमज – (शतशब्दकथा)

गैरसमज – (शतशब्दकथा)

“नाही जमणार”“काय?हे बघ, लग्नाच्या आधी ह्या विषयावर आपलं बोलणं झालेलं तेव्हा असंच ठरलं होतं ना, म्हणजे तुला आठवत असेल तर ही माझी एक महत्वाची अट होती. आता तू नाही जमणार असं कसं म्हणू शकतोस?”“तू म्हणतेस तसंच ठरलं होतं आधी. पण नाईलाज आहे.”“मी प्रयत्न करून पाहते. After-all आता मी तुझी बायको आहे., माझा पूर्ण हक्क आहे.““जशी तुझी इच्छा” “Hello, आई, तुम्ही आपल्या पुण्याच्या घरी राहायला कधी येताय? “………“तुमच्याशिवाय आमच्या संसाराला काही अस्तित्व किंवा अर्थ नाही. आम्ही वाट पाहतोय.” मुलाच्या संसारात आपली…

Read More Read More

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. “आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.” “आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?” “काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?” “ड्रग्स?” “अदिती तशी मुलगी नाही.“ “दारू?” “काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.” “मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?” “असू शकेल. नुकतंच लग्न झालेलं असूनही…

Read More Read More

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

स्पंदन दिवाळी अंकाचे हे पहिले वर्ष आहे. साहित्यप्रेमी असणाऱ्या ४ मैत्रिणींनी एकत्र येऊन ह्या अंकाची निर्मिती केली आहे. ह्या साहित्यफराळाचा जरूर आस्वाद घ्या आणि अंक कसा वाटला हे आपल्या मौल्यवान प्रतिक्रियांद्वारे कळवा. आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे, हा अंक ई-साहित्य प्रतिष्ठान (http://www.esahity.com/) ने त्यांच्या site वर उपलब्ध करून दिला आहे. तसेच स्पंदन दिवाळी अंक ह्या लिंकवर जाऊन वाचता येईल. googleDrive लिंक संपादक मंडळ: १. पल्लवी कुलकर्णी (किल्ली) २. सिद्धी पलांडे चव्हाण ३. अर्चना गवस ४. मधुरा कुलकर्णी

error: Content is protected !!