भेट
आठवते दिवसजेव्हा तू आणि मीफक्त दोघेच असंचउगाचनेहमीचतिन्हीसांजेला भेटायचो तेज गेलेलेथकलेलेकोमेजलेलेचेहरे असायचे भावनाइच्छाआकांक्षाफक्त एकच भूक… —————————#random#killicorner#गूढार्थ————————-© *पल्लवी कुलकर्णी/किल्ली*————————-
कविता

पूर्वीची मी ….. आताची मी _ कविता ———————————— पूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे । आता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही कुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही ।। पूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे बिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे । आताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही कुणी खात असेल तर आवडतही नाही ।। पूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे अनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे…
परी व्हायचंय मला _ कविता ———————————————– असे कसे हे शोषित पारतंत्र्यातील जगणे बंधनाच्या कोंदट कारागृहात मनाला जखडून ठेवणे | व्यक्त होऊ पाहणाऱ्या जाणिवांना थांबवणे भावनांना आतल्या आत दाबून टाकत कुढत राहणे || सगळे साखळदंड तोडून टाकणार मी कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार मी | वायुप्रमाणे संचार करणार मी अनंत ब्रह्मांडे पालथी घालणार मी || स्वातंत्र्याचे पंख लेवून स्वछंदपणे विहरायचंय ह्या कोंडलेल्या श्वासांना मुक्त करायचंय | स्पंदनांच्या जाणिवांना व्यक्त करायचंय पिंजरा तोडून भरभरून जगायचंय|| नाजूक नकोत, मजबूत पंख हवेत मला उत्तुंग भरारीसाठी…