Browsed by
Category: Recipees/ पाककृती

The tried and tested special recipees

डालगोना ताक

डालगोना ताक

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली कोणती रेसिपी असेल तर ती आहे उपरिनिर्दिष्ट डालगोना(ज्या शब्दाचा नेमका उच्चार मला माहित नाही तो शीर्षकातला शब्द) कॉफी. पण भारताच्या भर उन्हाळ्यात ही कोल्ड कॉफी थंडावा देईल हे काही मनाला पटेना. (फेटायचा कंटाळा हे खरे कारण, शिवाय कुठलाही ट्रेंड आला की आम्ही त्यात सामील न होता आपले वेगळेपण दाखवून देतो. असो. ) मग आमची स्वारी अस्सल देशी ताकाकडे वळली. त्यात नावीन्य आणायचा प्रयत्न केला आहे. नेहमीच काहीतरी आगळे वेगळे, खास आणि कुणीही आतापर्यंत न बनवलेले…

Read More Read More

दाल – बाटी ( सोपी_सविस्तर)

दाल – बाटी ( सोपी_सविस्तर)

लागणारे जिन्नस:  बाटीसाठी साहित्यः– गव्हाचं पीठ (६ पोळ्यांचं)[नेहमी घरी पोळ्यांसाठी वापरतो ते पीठ घेतलं तरी चालेल, आपल्याला सोप्या पद्धतीने जास्त ताण न घेता रेसीपी बनवावयाची आहे. त्यामुळी पीठ मुळी जाडच पाहिजे, बारिक नको, रवाच पाहिजे अशा कही अटी नाहीत. साधी , सरळ सोपी भोळी भाबडी रेसीपी आहे. ]– मक्याचं पीठ ( एका पोळीचं) (हे ऐच्छिक आहे, नसले तरी चालते)– जीरे ( चवीनुसार, साधारण २ लहान चमचे भरून भेसळमुक्त जीरे )[मी कधी कधी जीरे, मोहरी, मेथी दाणे एकत्र करून ठेवते. ते तसे येथे चालणार नव्हते,…

Read More Read More

नाचणी – वाळकाचे पौष्टिक थालीपिठ

नाचणी – वाळकाचे पौष्टिक थालीपिठ

घटक:  2 किसलेले वाळूक/वाळूख – (वाळूक नसेल तर मध्यम आकाराची किसलेली काकडी २ )[वाळूक ही काकडीसारखी फळभाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मराठवाड्यात सहज मिळते. पुण्यात कधी दिसले नाही. ह्याची चव जराशी आंबूस असते. बाकी गुणधर्म काकडीसारखे असतात. बिया वाळवून नंतर सोलून खातात. वाळकाचे लोणचे, कोशिंबीर असे विविध पदार्थ करता येतात. उपासाला चालते.वाळूक किसण्यासाठी त्याचे मधोमध चिरून ८ भाग करावेत. बिया कढून टाकाव्यात. फोडीच्या मागच्या भागाला किसणीवर धरून किसावे. साल शिल्लक राहते व गर किसला जातो. ह्या पद्धतीने काकडी, दुधी सुद्धा किसता…

Read More Read More

पुडचटणी

पुडचटणी

 पुडचटणी किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस:  हरभरा डाळ १ पेलाउडीद डाळ १/२ पेलातीळ १/२ पेलातांदुळ १/२ वाटीगुळ १/४ किलोमोहोरी २ छोटे चमचेजिरे २ छोटे चमचेमेथी दाणे २ छोटे चमचेहिंग चवीनुसारमीठ चवीनुसारलाल तिखटाची पूड १ वाटीसुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करूनहळद १/२ छोटा चमचातेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी क्रमवार पाककृती:  १ – तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)२ – डाळी, तांदूळ, तीळ…

Read More Read More

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस:  गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचेबेसन १ मोठा चमचाजीरे चिमूटभरओवा चिमूटभरतीळ चुटकीभरचवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरूनबटर अमूल ची अर्धी वडीचीझ क्युब २-३ किसूनमोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनकोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनतेलपिण्यायोग्य पाणी पाककृती:  औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे…

Read More Read More

error: Content is protected !!