आठवणी – बहिणाबाई माझी बाळ गं !
मी आणि मांडीवर माझी धाकटी बहीण..————————-#killicorner————————-ती बाळ असतानाची गोष्ट. अस्मादिकांना ताई झाल्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद झाला होता. असं वाटायचं आपणच पूर्ण वेळ बाळाला घेऊन बसावे.आई बाबा सोडून इतर कोणीही तिला घेतलेलं मला आवडत नसे.पण ती शहाणी माझ्याकडे आली की मोठ्याने गळा काढून रडत असे. असंच घरात एकदा फोटो काढणं सुरू होतं. मीही छान लाल फ्रॉक घालून बसले होते. मावशीला भांडून तिचं गळ्यातलं मी घातलं, ती सांगत होती, तुझा फ्रॉकचा गळा बंद आहे, गळ्यात काय घातलंय ते दिसणार नाही वगैरे….