डालगोना ताक
सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली कोणती रेसिपी असेल तर ती आहे उपरिनिर्दिष्ट डालगोना(ज्या शब्दाचा नेमका उच्चार मला माहित नाही तो शीर्षकातला शब्द) कॉफी. पण भारताच्या भर उन्हाळ्यात ही कोल्ड कॉफी थंडावा देईल हे काही मनाला पटेना. (फेटायचा कंटाळा हे खरे कारण, शिवाय कुठलाही ट्रेंड आला की आम्ही त्यात सामील न होता आपले वेगळेपण दाखवून देतो. असो. ) मग आमची स्वारी अस्सल देशी ताकाकडे वळली. त्यात नावीन्य आणायचा प्रयत्न केला आहे. नेहमीच काहीतरी आगळे वेगळे, खास आणि कुणीही आतापर्यंत न बनवलेले…