नाचणी – वाळकाचे पौष्टिक थालीपिठ
घटक: 2 किसलेले वाळूक/वाळूख – (वाळूक नसेल तर मध्यम आकाराची किसलेली काकडी २ )[वाळूक ही काकडीसारखी फळभाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मराठवाड्यात सहज मिळते. पुण्यात कधी दिसले नाही. ह्याची चव जराशी आंबूस असते. बाकी गुणधर्म काकडीसारखे असतात. बिया वाळवून नंतर सोलून खातात. वाळकाचे लोणचे, कोशिंबीर असे विविध पदार्थ करता येतात. उपासाला चालते.वाळूक किसण्यासाठी त्याचे मधोमध चिरून ८ भाग करावेत. बिया कढून टाकाव्यात. फोडीच्या मागच्या भागाला किसणीवर धरून किसावे. साल शिल्लक राहते व गर किसला जातो. ह्या पद्धतीने काकडी, दुधी सुद्धा किसता…