Browsed by
Tag: द्विशतशब्दकथा

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. “आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.” “आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?” “काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?” “ड्रग्स?” “अदिती तशी मुलगी नाही.“ “दारू?” “काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.” “मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?” “असू शकेल. नुकतंच लग्न झालेलं असूनही…

Read More Read More

ती निघाली – द्विशतशब्दकथा

ती निघाली – द्विशतशब्दकथा

ती निघाली. ती त्या विशिष्ट वेळी घाईघाईने एका प्रवासाचा आरंभ करण्यास निघाली. ह्या प्रवासाच्या प्रत्येक पल्ल्यावर संघर्ष करावा लागतो हे माहित असूनही ती जाण्यास निघाली. शेवटी काहीही झाले तरी आयुष्यात कर्तव्यपूर्ती महत्वाची हे जाणून ती निघाली. पहिला टप्पा कुठलेही विघ्न न येता सुरळीत पार पडला. दुसऱ्या टप्प्यावर सुरु झाला संघर्ष!! हो संघर्षच तो! तिच्यासारख्याच सैनिकांचा जमाव तिला आडवा आला. एकेकाला चपळाईने झपाट्याने मागे टाकत ती निघाली. पुढच्या टप्प्यावर निसर्गाची अवकृपा सहन करावी लागली. पण संरक्षक कवच आणखी मजबून करून ती…

Read More Read More

किंकाळी – द्विशतशब्द भयकथा – मीना

किंकाळी – द्विशतशब्द भयकथा – मीना

मीना त्या दिवशी अंधारून आले होते.भर दुपार असुनही काळोख दाटला होता. वारा सुटला होता. खिडक्यांची तावदान एकमेकांवर आपटून आवाज होत होता. भरीस भर म्हणून झाडांच्या पानांची सळसळ चालूच होती!! मीना घराच्या आतल्या खोलीत एकटीच पुस्तक वाचनात मग्न होती. वाचन सुरु झाले की तिला कशाचेही भान राहत नसे. अचानक तिने पाहिले की समोरच्या भिंतीजवळ एक अभद्र आकार वळवळ करत होता. त्याचा रंग कसलातरी विचित्र, गडद तपकिरी प्रकारात होता. काहीतरी किळसवाणं होतं ते!! हे नक्केच सामान्य नव्हतं.वेगळं होतं! त्या आकाराला काळ्या रंगाच्या…

Read More Read More

error: Content is protected !!