Browsed by
Tag: भयकथा

भूतबाधा आणि आकाश

भूतबाधा आणि आकाश

भूतबाधा? _ आकाश ———————————– कामाचा प्रचंड लोड उपसत व ऑफिसच्या बदलत्या वेळा सांभाळत आकाश दमून जायचा. कधी रात्रपाळी, तर कधी अर्धा दिवस अर्धी रात्र अशी वेळ गाठावी लागे. उशिरा घरी येणे नेहमीचेच झाले होते. जनसामान्यांची संध्याकाळ म्हणजे त्याची ऑफिसला जायची वेळ असे. शेजाऱ्यापाजाऱ्यांना तो क्वचितच दिसे. त्यामुळे त्याची आजूबाजूच्या लोकांशी फक्त तोंडओळख होती. पण कामाच्या अनियमीत वेळा ही एक गोष्ट सोडली तर काम, पगार आणि कंपनी चान्गली असल्यामुळे ही कंपनी सोडण्याचा सध्या तरी त्याचा काही विचार नव्हता. एकंदरीत त्याचं बरं चाललं…

Read More Read More

आवाज (शतशब्द भयकथा)

आवाज (शतशब्द भयकथा)

आवाज – शतशब्द भयकथा रात्रीची वेळ होती. अमावास्या असावी. दिवे गेल्यामुळे किर्रर्र अंधार दाटला होता. सर्वात वरच्या मजल्यावर तिचे घर होते. एकटीच राहणारी ती कुतूहलाचा विषय होती. अंगावर गच्च पांघरूण ओढून ती झोपण्याच्या प्रयत्नात होती. इतक्यात छतावरून धप्प धप्प आवाज येऊ लागले. मागे एकदा इमारतीच्या कुणीतरी आत्महत्या केल्यापासून गच्ची कायमची बंद करण्यात आली होती. हे आवाज कुठून, कसे येत असतील ह्या विचाराने ती घाबरली, भीतीने शब्द फुटेनात, घशाला कोरड पडली. आवाजांची तीव्रता कमी जास्त होत होती. अचानक तिला खिडकीबाहेर काळ्या…

Read More Read More

खुर्ची _ भयकथा

खुर्ची _ भयकथा

खुर्ची ही भयकथा किल्ली सहर्ष पोस्ट करत आहे. अस्मादिकांच्या मित्रमंडळात चाललेल्या “माझे भुताचे अनुभव” ह्या चर्चेतून कथाबीज आलेले असून थोड्याफार प्रमाणात सत्यकथा म्हंणता येईल. त्याबद्दल मी माझी मैत्रीण गायत्री आणि तिचे पती ओंकार ह्यांची आभारी आहे. कथेचा नायक मिलींद आहे असे म्हणता येईल. अर्थात वाचत असताना नायक कोण आणि खलनायक कोण हे चाणाक्ष वाचक ओळखतीलच. सादरीकरणाचे लेखनस्वातंत्र्य घेऊन घटनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेच हेतू नाही.मनोरंजनासाठी ह्या कथेचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.खुर्चीला तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मंडळ…

Read More Read More

किंकाळी – द्विशतशब्द भयकथा – मीना

किंकाळी – द्विशतशब्द भयकथा – मीना

मीना त्या दिवशी अंधारून आले होते.भर दुपार असुनही काळोख दाटला होता. वारा सुटला होता. खिडक्यांची तावदान एकमेकांवर आपटून आवाज होत होता. भरीस भर म्हणून झाडांच्या पानांची सळसळ चालूच होती!! मीना घराच्या आतल्या खोलीत एकटीच पुस्तक वाचनात मग्न होती. वाचन सुरु झाले की तिला कशाचेही भान राहत नसे. अचानक तिने पाहिले की समोरच्या भिंतीजवळ एक अभद्र आकार वळवळ करत होता. त्याचा रंग कसलातरी विचित्र, गडद तपकिरी प्रकारात होता. काहीतरी किळसवाणं होतं ते!! हे नक्केच सामान्य नव्हतं.वेगळं होतं! त्या आकाराला काळ्या रंगाच्या…

Read More Read More

error: Content is protected !!