Browsed by
Tag: लघुकथा

डेटिंग बिटिंग

डेटिंग बिटिंग

“काय सांगतेस काय ईशा? तू त्या मुलाला dating app वर भेटलीस? अगं आधीच मुलांचा काही भरवसा  नसतो आणि हा तर अशा ठिकाणी भेटलाय.” “अशा ठिकाणी म्हणजे? अगं हे apps हल्ली खूप जण वापरतात. Casual dating असलं तरी माणसं खरीच असतात ना?” “ते गाणं ऐकलंयस ना, casual friends थे फिर bestfriends हो गये?” “हो अगं, बिगिनी शूट, काहीही आणि, ते गाणं नाहीये मुळात “ “गाणं असो वा डायलॉग तू मुद्दा लक्षात घे “ “Ok dear,जास्त involve नाही होणार आणि alert राहणार….

Read More Read More

एक चहा वाफाळलेला

एक चहा वाफाळलेला

एक चहा वाफाळलेलालघुकथा…………………………………..“आज चहा दिवस आहे, फेसबुकवर post होती कुणाचीतरी”“What rubbish!”“अरे खरं सांगतेय ““प्रश्न तुझ्या सांगण्याचा नाही ““मग? तुला नेहमीच माझ्या सांगण्यावर शंका असते, किंवा सरळ दुर्लक्ष करतोस. तेच कोणा मित्राने सांगितलं तर तासभर त्याविषयावर बोलत राहशील. मी सांगितलं तर त्या ध्वनीलहरी सोयीस्करपणे कानाच्या बाहेरून परततील ““अगं तसं नाही काही, एक मिनिट, तुला खरंच असं वाटतं?”“वाटायला कशाला हवंय, सत्य आहे ते, #fact, you know ““बरं ते सोड,चहाचं काय म्हणत होतीस?”“अरे हा, असं विषयांतर करतोस तू बघ. मी काय म्हणत होते…

Read More Read More

कुसुम (लघुकथा)

कुसुम (लघुकथा)

गरिबाला कसल्या आल्यात भावना आणि फीलिंग्स? ही उच्चभ्रू लोकांची थेरं! आपण पडलो स्वभावाने आणि पैशाने गरीब. सतत मन मारून जगणारे किडे. बालपणी मोठ्यांच्या शिव्या खायच्या, त्यांना दबकून राहायचं, तरुणपणी शक्य असेल तितकं शिक्षणात स्वतःला झिजवायचं. मग एखादी सरळसोट चाकरी, लग्न, मुलं आणि म्हातारपणी मिंधं होऊन जगायचं!ही काय life आहे?सतत कुणालातरी वचकून राहायचं, कधीच मोकळेपणा मिळाला नाही, आणि आता ह्या वयात जिथे आम्हाला रिटायरमेंट ही सुद्धा शिक्षा वाटू लागलीये तिथे भावना समजून घेण्याची नाटकं कशाला?नकोच.सदाशिवराव तावातावाने बोलत होते.स्वतःशीच!बाथरूमच्या आरशात पाहून.त्यांची ही…

Read More Read More

Typically bored

Typically bored

………………………………………………………………………………………………”त्याचा भूतकाळ झरझर डोळ्यासमोरून सरकू लागला आणि तो आठवणींच्या राज्यात गेला. “एक कथा वाचताना हे वाक्य वाचलं तशी ती खुद्कन हसली. तिच्या नवीन वेब सिरीजसाठी कथा निवडण्याचे काम हाती घेतले होते“आजकाल लिखाण किती cliche वाटतं ना आपल्याला! विशेषतः नवीन लिहू लागलेल्या लेखकांचं लिखाण साचेबद्ध असतं. पावसाळ्यात सर्व कवींच्या पावसाळी कविता सारख्याच वाटाव्यात तसं. काही वाक्ये तर आपोआपच डोक्यात येतात इतकी पाठ झालेली असतात वाचून वाचून.सगळीकडे ठराविक पॅटर्न, स्त्रियांची म्हणून जी मासिकं येतात त्यांच्याबद्दल तर विचारायलाच नको.आजकाल online लिहिणाऱ्या लेखकांचे पेव…

Read More Read More

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा – (द्विशतशब्दकथा)

नशा लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. “आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.” “आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?” “काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?” “ड्रग्स?” “अदिती तशी मुलगी नाही.“ “दारू?” “काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.” “मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?” “असू शकेल. नुकतंच लग्न झालेलं असूनही…

Read More Read More

error: Content is protected !!