स्वलिखित quotes
“ आयुष्य हे समुद्राच्या खोल पाण्यात लाटांच्या धडकेत सापडलेल्या एकाकी नावेसारखं असतं, अस्थिर चंचल तरीही मनमोहक !! दुरून एखाद्या चित्रातल्यासारखं दिसणारं हे दृश्य आतल्या आत बरंच काही कमावत आणि गमावत असतं. ” ………………………………………………………………………………………………………………………… “ आयुष्यात स्थैर्य हा केवळ भ्रम आहे. स्थिर राहण्याने फारशी प्रगती होत नाही. जेव्हढी मनात आंदोलने जास्त, चंचलता जास्त, तेवढी विचारांची गती वाढते आणि वेगवेगळ्या घटना घडतात. तुम्ही स्वतः हे नाही केलेत तरी नियती मानवाला कायमच अस्थिरतेच्या अंधकारात गटांगळ्या खायला लावते. ” ……………………………………………………………………………………………………………………. “ नवनिर्मिती घडवायची असेल तर थोडी तरी कळ सोसायला…