Browsed by
Tag: शतशब्दकथा

विबासं – शतशब्दकथा

विबासं – शतशब्दकथा

“आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे”“काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे”“ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे”“काय?”“विबासं”तो फक्त हसला.“असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय”“बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस”“संबंध नाही कसं? ही समस्या तुझ्यामुळेच निर्माण झाली आहे. तूच हा गुंता सोडवायला हवास. मी आज विबासं करू शकत नाही ते केवळ तुझ्यामुळे. जरा गंभीरपणे विचार कर. तुलाही ह्यातून कदाचित जीवनातले…

Read More Read More

सुट्टी – (शतशब्दकथा)

सुट्टी – (शतशब्दकथा)

काकूंनी कर्कश्य आवाजात किंचाळून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं तोंड दाबून ती पुन्हा झोपली. पण एवढ्या-तेवढ्यावर ऐकतील त्या काकू कसल्या? एकदम चिवट स्वभाव! त्यांनी १० मिनिटांनी पुन्हा तारसप्तकात सूर आळवला.काकू पूर्वी मंजुळ आवाजात हाक मारून तिला उठवत असत. पण वरचेवर आळशी होत जाणारा तिचा स्वभाव आणि तिनेच कधीतरी दिलेल्या सूचनेला अनुसरून त्यांनी वारंवार किंचाळून उठवणं सुरु केलं होतं. एखाद्याला झोपेतून उठवणं हे फार भारी काम नव्हे. पण काकू आपलं कर्तव्य नेटाने निभवत असत.शेवटी ती उठून तयारी करू लागली. काकूंमुळे आज…

Read More Read More

गैरसमज – (शतशब्दकथा)

गैरसमज – (शतशब्दकथा)

“नाही जमणार”“काय?हे बघ, लग्नाच्या आधी ह्या विषयावर आपलं बोलणं झालेलं तेव्हा असंच ठरलं होतं ना, म्हणजे तुला आठवत असेल तर ही माझी एक महत्वाची अट होती. आता तू नाही जमणार असं कसं म्हणू शकतोस?”“तू म्हणतेस तसंच ठरलं होतं आधी. पण नाईलाज आहे.”“मी प्रयत्न करून पाहते. After-all आता मी तुझी बायको आहे., माझा पूर्ण हक्क आहे.““जशी तुझी इच्छा” “Hello, आई, तुम्ही आपल्या पुण्याच्या घरी राहायला कधी येताय? “………“तुमच्याशिवाय आमच्या संसाराला काही अस्तित्व किंवा अर्थ नाही. आम्ही वाट पाहतोय.” मुलाच्या संसारात आपली…

Read More Read More

पॅचअप – शतशब्दकथा

पॅचअप – शतशब्दकथा

“खरं सांग, तू अजूनही भेटतेस त्याला? चोरून? “ महान पातकाची कबुली द्यावी तशी मान खाली घालून ती पुटपुटली.“कधी कधी.” “पण तू त्याच्याशी रीतसर ब्रेकअप केलं होतंस”“मला त्याची आठवण येते. एकेकाळी भरभरून प्रेम केलंय रे” “एकांतात भेटलात?”“एकदाच. दोन-तीन वेळा मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा भेटलेय” “आवर स्वतःला.”“प्रयत्न केले. जमत नाहीये. विशेषतः अशा धुंद पावसाळी संध्याकाळी त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण…. ““बास.. मला काहीही ऐकायचं नाहीये. एवढंच सांगतो, विसर त्याला”“पहिलं प्रेम विसरता येतं?”“तुझ्या पुढाकाराने ब्रेकअप झालं ना? मग आता अशी का वागतेयस?”“नाही सांगता येणार. पण मी…

Read More Read More

आतुरता – शतशब्दकथा

आतुरता – शतशब्दकथा

आतुरता – शतशब्दकथा ——————–*—————————————————————————- घराच्या ओसरीवर कट्ट्यावर बसून ती त्याची वाट पाहत होती. वेडी! त्याने अजूनही तिची दखल घेतली नव्हती, कदाचित घेणारही नव्हता. हे माहित असूनही ती रोज त्याची वाट पाहत असे आणि तो दिसताच आनंदून जात असे.त्याचं तेजस्वी रूप तिच्या मनात व्यापलं होतं. एके दिवशी त्याला पाहू शकली नाही तेव्हा तिची चर्या दुःखाने काळवंडून गेली होती. नेहमीसारखा तो विशिष्ट वेळी येणार हे माहित असूनही मोठ्या आशेने आधीपासून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. दोघांचा मूक संवाद नेहमीच चाले. दुरून!…

Read More Read More

error: Content is protected !!